STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

अक्षय तृतिया

अक्षय तृतिया

1 min
261

मं गळावरही आपण स्वारी केली

ग तकाळी विज्ञानाच्या जोरावर

ल लकारी यशाची घुमऊनी

वा जवित डंका शिक्का उमटविला जगतावर..


र डके जीणे टाकून दिले

अ नाहूतपणे विजय मिळवूनी उर्मीवर

क्ष णोक्षणी जपूनी अस्मिता

य शाच्या आपल्या ताकतीवर...


तृ ण लव्हाळ्याचे होऊन कर्तृत्वाने

ति मिरात ही तगलो आपण धैर्याने

या धवल क्रांतीचे स्वागत केले

   हसतमुखाने मोठ्या शौर्याने...


  आज अक्षय तृतीया मुहूर्त पहा

  आला नव चैतन्य घेऊन

  चला नवं संकल्प करूया 

  देशासाठी थोडे थोडे योगदान देऊन...


  डिजिटल क्रांतीचे पाईक होऊ

  हरित क्रांत्तींचे पुन्हा बीज पेरू

  चला पुन्हा या शुभ मुहूर्तावर

  नवं जीवन जोमाने पुन्हा सुरू करू....!


Rate this content
Log in