अखंडित कल्याणकारी काव्य
अखंडित कल्याणकारी काव्य
सुखी सारे व्हावे स्वच्छता पाळून जीवन जगावे
जगावे की मरावे हाच एक प्रश्न उरी!
उरी दाटलेले भय मी तरी गं कशी
दाखवू?
दाखवू म्हटले तरी होईल का कधी
शक्य तरी!!१
तरी का ठरते मीच भित्री भागुबाई
सदा
सदा वंदनीय स्फूर्ती दायी सरिता मीच खरी!
खरी ओळख उशीरा पटली होती
संतांची या जगाला
जगाला दाखवून द्यावा लागतो येथे संयमीपणा तरी!!२
तरीही डोळ्यात अश्रू उभे राहतात नकळत
नकळत मी गुरफटत चालले आहे या संसारात !
संसारात कपाळावर आठ्या आणून नसते चालायचे
चालायचे असते एकमेकांना समजून घेऊन अंधारात!!३
अंधारात मोकळा होतो स्पर्श करायला मार्ग प्रकाशलहरींचा
प्रकाशलहरींचा व सावल्यांचा खेळ लागतो रंगायला!
रंगायला लागला खेळ मग
समजतच नाही वेळ
वेळ जिवघेणा होतो कधीं कधीं स्वप्न लागते जेव्हा भंगायला!!४
भंगायला मूर्ती नको असते पण नसतो इलाज काही
काही ठिकाणी आपणच असतो जबाबदार नावाला!
नावाला विरोध करतात सारे विरोधक नसतो जेव्ह त्यांच्या सवे
सवे त्यांच्या असतात तोंडपूजे ज्यांच्या नसतो मूळी गावाला!!
