अखेर मी जगू लागले
अखेर मी जगू लागले
1 min
228
नैराश्याने ग्रासलेली मी
उदासीन होऊन बसले मी
स्वतःशीच अबोल झाले मी
तेव्हा कुणीतरी टकटक
करत माझ्या जीवनात आला
पाहिलं ही नाही त्याला मी
तो नुसता बोलतच राहिला
आणि मी ऐकतच राहिले
थोड्या वेळाने मला जाणवले
माझ्यात शक्ती जागी झाली
मनात एकच निश्चय केला
आपला जीव खूप अनमोल
त्याचे असू करू नये बेहाल
उठ मर्दानी झांसीची राणी
तुझी आहे अनोखी कहाणी
माझ्यातली प्रतिभा कळाली
कवयित्री म्हणून उभे राहिले
अखेर मी जगू लागले ......
