अजूनही
अजूनही
1 min
210
धृतराष्ट्र आंधळे नव्या भारतातही
गांधारीचे वारस आहेत अजूनही
पक्षासाठी बांधली पट्टी अंधभक्तांनी
वास्तवाकडे डोळेझाक ती अजूनही
पटते ना टीका निंदा नेत्यांची जराही
मेंढरे सारी झापडबंद अजूनही
चुकीच्या निर्णयांचे होई समर्थन
सुडाने पेटलेली मने अजूनही
लोकशाहीतून जन्मे हुकुमशाही
आक्रंदते लोकशाहीही अजूनही
