Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pranjali Kalbende

Others

3  

Pranjali Kalbende

Others

अजूनही आठवते

अजूनही आठवते

1 min
366

अजूनही आठवते मला स्पष्ट

तुझे ते खाली मान घालून येणे

झूकलेल्या नजरेनेही स्वतः बरोबर

मला तुझ्या दिशेने घेऊन जाणे //१//

अजूनही आठवते मला

तुझे ते रोखून माझ्याकडे बघणे

वाटेत अचानक थबकणे

मिश्कील गाली हळू हसणे //२//

अजूनही आठवते मला सखे

तूझे मुकपणे सांगणे सतावते

घेते मी परीक्षा तुझ्या हदयाची

झेल घाव तू सख्या ,मी जे जे देते //३//

ऋतू बदलतांना मला

आठवले तुझे बदलणे

थंडीच्या नंतर पानगळती

नाही कळले ते तुझे वागणे //४//

Rate this content
Log in