STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Others

अजून सारे तसेच आहे.

अजून सारे तसेच आहे.

1 min
256

शाळाही तीच वर्गही तेच

मैदान ही आज तेच आहे

सरली सेवा वय आमचे

अजून सारे तसेच आहे.।

काळे फळे नि पांढरे खडू

मुलांचे नित्य बागड आहे

रोजच शाळा भरते आहे

अजून सारे तसेच आहे.।

ते प्रेम तोच जिव्हाळा आहे.

मनात तोच ओलावा आहे

ध्यानातही तीच शाळा आहे.

अजून सारे तसेच आहे.।

पाने पांढरी वहीही तिच

कलकल ही तशीच आहे

निवृती आले जीवनी आज.

अजून सारे तसेच आहे.।

गुरु जातील शिष्य येतील

नविन पिढी तयार आहे

संपली सेवा प्रवास आता

अजून सारे तसेच आहे.।

माझी शाळा माझ्या मनी आहे.

विद्या दानचि जीवन आहे

भाग्य लाभले मज जीवनी 

शारदा चरणी प्रणाम तुज

अजून सारे तसेच आहे।

_______________


Rate this content
Log in