अज्ञानी विज्ञानासाठी...
अज्ञानी विज्ञानासाठी...


पाप पुण्याचा असेल खेळ
असेल ढिगाऱ्याने जात पात
पिढीजात मानणारा धर्म
पण नको माणुसकीचा घात
अज्ञानाचा आपलाच शत्रू
विचारांत आज फोफावला
पवित्र स्त्रीजन्माचा विटाळ
मासिक पाळीत का अडला
बनविणाऱ्यास नाही हरकत
मग स्त्री-पुरुष भेद का केला
अविचारी नियमांच्या गाथेत
बदनामीचा धब्बा का लावला
जिवाभावाची प्रेमळ नाती
विश्वासात अनमोल जपता
प्रत्येक हृदयी श्रद्धेचा पवित्रा
मग दगडातच देव का बघता
विज्ञान शोधांची गगन भरारी
तरीही जन्मास मृत्यूचे भय पाही
कुकर्मी शिक्षा अमानवी म्हणुनी
अत्याचाराचे अज्ञान का वाही
विज्ञाना, एक ओळ तुझ्यासाठी
प्रकाशी शास्त्रशुद्ध बदलाची
जागृतीचा ध्यास कवटाळून
अंधश्रद्धा मनातून मिटविण्याची