STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

अज्ञानी विज्ञान...

अज्ञानी विज्ञान...

1 min
195

पाप पुण्याचा असेल खेळ 

असेल ढिगाऱ्याने जात पात 

पिढीजात मानणारा धर्म 

पण नको माणुसकीचा घात 


अज्ञानाचा आपलाच शत्रू 

विचारांत फोफावला आहे 

पवित्र स्त्रीजन्माचा विटाळ 

मासिक पाळीत का आहे 


बनविणाऱ्यास नाही हरकत 

मग स्त्री पुरुष भेद का आहे 

गाथा अविचारी नियमांच्या 

बदनामीचा धब्बा का आहे 


जिवाभावाची प्रेमळ नाती 

विश्वासात अनमोल आहे 

प्रत्येक हृदयी श्रद्धेचा पवित्रा 

मग दगडातच देव का आहे 


विज्ञान शोधांची गगन भरारी 

तरीही जन्मास मृत्यूचे भय आहे

कुकर्मी शिक्षा अमानवी म्हणुनी 

अत्याचाराचे अज्ञान का आहे 


विज्ञान दिनी आज शपथ घेऊ 

प्रकाशी शास्त्रशुद्ध विज्ञानाची 

जागृतीची कास ध्यानी मनी बाळगू 

अंधश्रद्धा मनातुनी मिटविण्याची 


Rate this content
Log in