अजाण
अजाण
1 min
241
गोंगाट नसून किलबिल ऐकवी
आरपार जाऊन मनात साठवी
आनंद द्विगुणित अनेक क्षणांचा
नांदत अग्णिक समूह पक्षांचा
परीस स्पर्शासारख्या लता वेली
फांदीवर विसावत दवास झेली
पंखात मावली सृष्टीची सुंदरता
नखान रुतवली पकड पाहता
नयन लहान नजर बाण
पकड सैल शिकारीस अजाण
