ऐतिहासिक दिनविशेष
ऐतिहासिक दिनविशेष
राजा छत्रपती शिवबा सम सुपुत्र घडवता!
जाहली जिजाऊ धन्य तयाची राजमाता!!१
स्वामी विवेकानंदा सम पुत्राचा जन्म होता!!
माता भुवनेेश्वरी झाली प्रसन्न पुत्र नरेंद्र पाहता !!२
थोर पुत्रांचा जन्म या भारत भूवर होता !
गौरवान्वित जाहली आमची भारत माता!!३
हिंदवी स्वराज्य संस्थापक पुत्ररत्न शिवबाच्यासाठी!
खंबीर उभी माता जिजाऊ धुरंधर सुपुत्राच्या पाठी!!४
स्वराज्याच्या कार्यात तिन्ही शाहींची आडकाठी!
निर्धाराने दिली प्रसंगी जिने नात्यांनाही मूठमाती!!५
आज्ञेत जिच्या घडले शिवराय छत्रपति!
राजमाता जिजाऊंची होती शुद्ध मती!!६
विवेक ठेवूनी नरेंद्र करी ध्यान ते चित्ती!
भागवतधर्माची पताका घेवूनी संगती!!७
शिकागोत विश्वबंधुत्वाची रीत शिकवती!
महती भागवत धर्माच्या गीतेची ठसविती!!८
स्थितप्रज्ञ विवेकानंद म्हणूनी ख्याती होई जगती!
योग्याची भगवी वस्रे लेऊनी केली विश्वभ्रमंति!!९
गुरु रामकृष्ण परमहंसाची राखली शान!
जाज्वल्य देशप्रेमाचे घडवित खरे ज्ञान!!१०
विवेकाच्या तेजाने या देशाची स्वामी नरेंद्र वाढवी शान!
जयंती दिन असे 'राष्ट्रीय युवादिन' गाऊ त्या गुणगान!!११
