अहंकारी तेजोगोल ....
अहंकारी तेजोगोल ....
1 min
309
आजकाल
सूर्यही हिटलरशाही करायला लागलाय
वणव्याचं साम्राज्य फोफावू लागला
अन
मांडलाय त्याने हुकूमशाहीचा उच्छाद
त्याच्या असल्या हुकूमशाहीखाली
भयाने गांगरून जाऊ नका ....
त्याचे अहंकारी तेजोगोल
अडकतीलच कधीतरी
काळोख्या ढगांखाली
मग होईल त्याच्या
अहंकारी तेजोगोलाची वजाबाकी
अन बाकी उरेल
भले मोठे शून्य ....
आणि
होईल शितलतेचा गुणाकार
आपल्या निरागस अंगणात
आणि
फुलणार हिरवेगार नंदनवन .... !!!!