STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

अहंकार

अहंकार

1 min
192

माणसातील अजाणशत्रू 

ओळखता येत नाही त्यास

 कारणीभूत ठरतो तो नाशास 

"अहंकार" म्हणतात त्यास

  

का म्हणून, अन्  

कशाचा अहंकार करावा?

पद, पैसा,मालमत्ता 

आज आहे उद्या नाही

विनाकारण चिंता अन् दुसऱ्याशी 

व्यर्थ स्पर्धा मग कशाला?


लहान,थोर, गरीब माणसांचा

 कधी अपमान न करावा

पैशाची गर्व कधी न करता  

दुसऱ्याच्या मनाचा 

नेहमी मान ठेवावा  


'माझच खर 'असा 

अहंकार कधी नसावा 

दुसऱ्याचा द्वेष का म्हणून करावा?

 छोट्या चुकांवर ओरडण 

चिडणं ते टाळाव 

 किष्ट अशा वादांना 

चर्चेविना मिटवाव 

स्वतःतल्या "मी" पणाला थोडं बाजूला ठेवाव

 विश्वास हा कसा मनामध्ये असावा

 हलक्या कानावर चुकूनही नसावा 

 जीवन किती जगलो,

 किती राहल  

व्यर्थ तो हिशेब नसावा 

 सदैव मनामध्ये दुसऱ्याविषयी 

आदर व प्रेमभाव वसावा  

स्वतःच्याच भावविश्वासत

 न जगता कधी दुसऱ्यांच्या सुख-दुःखात आपला

 सहभाग असावा

'अहंकाराचे होते रे घर खाली'  

कधी जिंकून, कधी हारून काबूत ठेवून रागाला

 निर्मळ मनाने इथे श्वास घ्यावा 

अहंकारामुळे विसरू नये आपल्या हास्याला  

धावपळीच्या जगात या शोधाव कधीतरी 

 विसाव्याच्या क्षणांना

 जुने तुटतील, नवे जुळतील द्यावे

 आलिंगन आपल्या जीवनाला..


साहित्याला गुण द्या
लॉग इन