STORYMIRROR

Shreya Shelar

Others

3  

Shreya Shelar

Others

अदृष्य संवेदना

अदृष्य संवेदना

1 min
245

घ्यावं भरून श्वासात 

आठवणींच्या जुन्या गंधाना 

धडकाव्यात कधी हृदयात 

अदृष्य त्या संवेदना

कधी होऊन लहान 

ऐकावं बोबड्या बोलांना 

नव्याने पुन्हा जाणावं

निरागस त्या डोळ्यांना 

कधी येऊ द्यावं जवळ 

चिवचिवणाऱ्या चिमण्यांना 


धडकाव्यात कधी हृदयात 

कोवळ्या त्या संवेदना

पेटवाव्या कधी त्या 

सुस्त अचल चेतना 

नाजुक फुंकरेनं विझवाव्यात

त्या धुमसत्या वेदना 

कधी थोडसं अलिप्त रहावं 

हलकेच सोडवुन बंधाना 

धडकाव्यात कधी ह्रुदयात 

नाजुकश्या त्या संवेदना

कधी बघावं आजमावुन 

भिववणाऱ्या साहसांना 


कधी मुक्त वाहू द्यावं 

रुसलेल्या त्या आसवांना 

कधी कसं मुक्त जगावं 

झुगारून साऱ्या बंधनाना 


धडकाव्यात कधी हृदयात 

अदृष्य त्या संवेदना


Rate this content
Log in