अडथळे...
अडथळे...
1 min
83
मी करणारच या विचाराला गाठलं,तर काहीही करू शकता,
आतल्या शत्रूचा करा पराभव, बाहेरचं जग तुम्ही सहज जिंकता
शस्त्र घेऊन अंगावर येतात,ते सर्वात मोठे धोकादायक नसतात,
खूप जास्त धोकादायक,जे नकारात्मक शब्द घेऊन पोहचतात
जे करतात स्वप्नाचा पाठलाग, ते यशस्वी होतात,
जे असतात अयशस्वी,ते कल्पना कृतीत उतरवणं नाकारतात
माणसं असतात दोन प्रकारची,काही देणारी तर काही घेणारी,
घेणारी विश्वास हिरावणारी, देणारी देतात स्वप्नाला उभारी
