STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

अडीच अक्षर प्रेमाचे

अडीच अक्षर प्रेमाचे

1 min
253

अडीच अक्षर प्रेमाचे भर

अंतर दोन जीवांचे मिटते

क्षत्रिय होई लढण्या मरण्या  

क्षतीग्रस्त भ्रमनिराशा होते


चंदन काया सडौल बांधा 

मृगमरिचीका रूप बहरते

खास कुणाची मुळीच नसते

नकळत येउन विव्हळते...


कळेना कैसे वीधीने जोडिले 

सुरेख सौख्याचे प्रेम निधान

भान हरपले माझे सख्यारे 

केले प्रियाने नयनी शरसंधान...


क्षणाभऱ्याचे प्रेमजीवन हे

ह्रदयातल्या कळ्या परीमळ

पुन्हा उड़ते त्याच क्षितिजी

मद्यधूंद रातराणीचा दरवळ...


दोन जीवाचे मिलन होता

एक फुलते जळी कमळ 

श्वासात भरून सोहळ्याचा

असतो गगनी आनंद सबळ...


Rate this content
Log in