Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

अभंगाचे सांगाती / सामाजिक विषय

अभंगाचे सांगाती / सामाजिक विषय

1 min
271


संत श्रेष्ठ सांगेI कर्जाची कसोटी

उरे ना लंगोटी I नेसायाशी


नसता हुनर |धरावी ना वाट

भाकरीचे ताट | सोडू नये


अंधश्रद्धा पाळी | त्याशी सत्य खोटं

तुकाराम नाठ Iम्हणे त्याशी


दामाजीचे साठी I तिर्थ वाटती

असा तो कपटी Iसाधु कसा ?


बाप लेकराचा Iसदा करी नशा

आणि अवदशा | घरामंधी


स्वच्छता न पाळे I तनूचा ये वास 

करती तो नाश | जीवनाचा


खंडीने लेकरे | नशिब म्हणती

स्वतःशी गणती | सुधारक


देवाशी नवस I कापती बकरू

मुखे पाजे दारू I वेडा भक्त


ध्येयाचे संगती Iकर्माशी बांधावे

चांगले रांदावे I शिजे नीट


शिक्षणाचे संगे I मैत्री करावीत

साधावे ते हित | आयुष्याचे


सांगे ग्रामगीता Iविषयाची नाड

वाचावे त्या गोड I अध्यायाशी


Rate this content
Log in