STORYMIRROR

purushottam hingankar

Others

2  

purushottam hingankar

Others

अभंग

अभंग

1 min
74

पंढरीशी जाता सुख वाटे चित्ता

बिगुल वाजिता तोची चाले !!१!!


निघे वारकरी पताकांचे भार

वैष्णव डिंगर चालती ते!!२!!


रामकृष्ण हरि गोविंद गोपाळ

चाले टाळ घोळ वैष्णवांचा!!३!!


माउलीचा घोड्या मागे तोची रथ

अभंगाची साथ गोड गळा!!४!!


संतदास म्हणे पाऊले चालती

गोड आळविती पांडूरंगा!!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन