अभंग
अभंग
1 min
72
अरे पांडुरंगा आलो तुझ्या द्वारी,
याचक भिकारी वारकरी!!१!!
तया दान देशी पुढील आयुष्य
वारिशी पायास सुखं देशी!!२!!
तुझ्या दानावीन मी एक पांगळा
दृष्टीचा आंधळा मायबापा!!३!!
संतदास म्हणे संत भक्त्त सारे
भजती तुजरे रात्रंदिन!!४!!
