अभंग
अभंग
1 min
182
सुप्रभातेशी त्या हरिसी वंदन
दिन आनंदान जाई सर्वा!!१!!
रामकृष्ण हरि मंत्र हा वरिष्ठ
करी पापा नष्ट पांडुरंगा!!२!!
मनं कलुषित असता सर्वत्र
भाग्याशी अपात्र तोची असे!!३!!
मना पवित्रता येई सर्वकाळ
हरीची ते माळ जपताची!!४!!
संतदास म्हणे स्वच्छते कारण
रामकृष्ण म्हण मुखे सदा!!५!!