अभंग आजचे
अभंग आजचे
1 min
202
प्रत्येक नाकावर I रागाचे साम्राज्य
संयम हा त्याज्य I सर्वांना या
यांना ठावे नाही I इथली रीतभात I
सांगू भीत भीत I राग येई
काही नको यांना I सणवार व्रत
रोजचा डाळभात I बरा असे
काही सांगू जाता I अपशब्द ऐका
नकोच ते फुका I ज्ञान देणे
येई जे समोर I तेच ओरपावे
ओठांना लावावे I कुलूप ते
*********
