अभिमान भारत मातेचा
अभिमान भारत मातेचा
आहे मला अभिमान भारत मातेचा
जो देश विशाल जगाच्या नकाशात
अप्रतिम असे स्थान पटकावलेला
पवित्र नद्यांचा प्रवाह उत्तरी भागात.
इंग्रजांनी छळले दिडशे वर्ष देशाला
क्रांतिकारी लढले प्राणपणाला लाऊनी
मुक्त केले ब्रिटीशांपासूनी भारत मातेला
स्मरूनी त्या विरांना वंदिते मातेला वाकुनी.
मज अभिमान आहे भारत मातेचा
भारतीय संस्कार संस्कृती जपणारा
एकतेच्या बळावर कार्य करणारा
ध्वज तिरंग्याची मान शान राखणारा.
अभिमान आहे वीर सैनिकांचा जे
डोळ्यात तेल घालुनी रक्षितात मातेला
घर संसार त्यागुनी जिवाची बाजी लाऊनी
सिमा रेषेवर तत्पर असतात देश सेवेला.
शत्रू आक्रमण अथवा आपत्ती काळी
बांधवात पहावा जिव्हाळा ममतेचा
अशी ममता बंधुत्व नाही सापडेल परदेशा
म्हणूनच वाटतो अभिमान भारत मातेचा
