आयुष्यातले इंद्रधनुष्य
आयुष्यातले इंद्रधनुष्य
1 min
157
रंगा रंगा ने रंगले
आज आपले आयुष्य,
जसे भासते नवीन
नभात इंद्रधनुष्य....
कोऱ्या जीवन गाथेत
रंग नव्याने भरले,
सुख-दुःखाच्या खेळात
धुंद होऊन जगले....
ऊन सावली पडली
प्रेम, त्याग, विरहात,
सुरु संघर्ष रोजचा
अस्तित्व टिकवण्यात....
चढे यशाची शिखरं
मोजे खोली समुद्राची,
घेत चटके मनास
यश नी अपयशांची....
सप्तरंग आयुष्याचे
उधळे अवकाशात,
सर्व रंग महत्वाचे
जगण्यास जीवनात....
