आयुष्यातील पहीला पगार
आयुष्यातील पहीला पगार
1 min
330
पगार होता थोडा परंतु
श्रीमंत त्यावेळी मी असे
हाती मिळता गगन ठेंगणे
हरखून मी जात असे
महिन्याभरातील कष्टाची
मोजदाद होई भारी
पगार हाती येताच
ती खर्चण्याची तयारी
पहील्या पगारात घेतला
पोषाख बाबांसाठी
आईला घेतली साडी
लग्नाच्या वाढदिवसासाठी
छोटासा पगार माझा
पण खर्चण्याची लिस्टच असे
आनंद आणि गरजेचा
मेळ त्यावेळी होत असे
लहानशा पगारात
बहीण-भाऊ मजा करायचो मस्त
आनंद जीवनाचा लुटून
वस्तू मात्र घ्यायचो स्वस्त
पहील्या पगाराचे समाधान
आज लाखोतही नाही
छोट्या पगाराने अंगी
निर्माण केली होती धिटाई
