आयुष्याच्या वळणावर
आयुष्याच्या वळणावर
आयुष्याच्या वळणावर जरासे मागे वळून पाहू
काय मिळाले काय हरवले याची गोळाबेरीज करू
लहानपणीचा होता काळ खूपच मजेमजेचा
ना कोणती चिंता ना विषय होता काळजीचा
तसे जीवन पुन्हा मिळेल का जरा शोध घेऊ
आयुष्याच्या वळणावर जरासे मागे वळून पाहू
शाळा कॉलेजमधील जीवन होते रहस्यमयी
मित्रांसोबत घालविलेले दिवस आठवतात आजही
तेच आनंदीमय जीवन मित्रांसंगे पुन्हा जगू
आयुष्याच्या वळणावर जरासे मागे वळून पाहू
कमावता झालो नाकासमोर पाय सरळ चालू लागले
संसार चालविण्यासाठी दोनाचे चार हात झाले
कुटुंबातील सर्वाना आपले प्रेम देऊ नि घेऊ
आयुष्याच्या वळणावर जरासे मागे वळून पाहू
आयुष्याच्या शेवटच्या टप्यावर आहे उभा
आठवणी फक्त मनात चेहऱ्यावर नाही प्रभा
जगायचं आयुष्य नाही तरी मजेत जगून पाहू
आयुष्याच्या वळणावर जरासे मागे वळून पाहू
