आयुष्याच्या वाटेकडे बघताना
आयुष्याच्या वाटेकडे बघताना
हे माणसा जरा थांब ना
माणुसकीला तू जप ना
किती ढवशिल ह्या दोन पैशासाठी
शेवटी रिकामाच येशील अन् रिकामाच जाशील
हे माणसा जरा थांब ना
स्वतः चा मन राखण्यासाठी धडपडतो
स्वतः ची वोळख तू विसरला आहे
शेवटी रिकामाच येशील रिकामाच जाशील
हे माणसा जरा थांब ना
स्वतः चा अहंकार किती जपशील
तेच घालवण्यात आयुष्य घालवशिल
शेवटी काय रिकामाच येशील रिकामाच जाशील
हे माणसा जातीच्या मागे किती धावशिल
माणुसकीला काळीमा किती फासशिल
स्वतः चा गर्व किती बरे करशील
शेवटी काय रिकामाच येशील रिकामाच जाशील
हे माणसा शेवटी एकटाच रडशील
कोणी कोणाचं नसतं एकटा तू पडशील
शेवटी काय रिकामाच येशील रिकामाच जाशील
