आयुष्याच्या ह्या वाटेवर
आयुष्याच्या ह्या वाटेवर
आयुष्याच्या ह्या वाटेवरती
मलाच मी पाहिले
त्यात मी माझंच सुख शोधत होते.
वाटलं कसं जगलो आपण
तीळ तीळ जमा करून
त्यात स्वतः लाच हरवून बसले
मोठं होण्याचं स्वप्नं मी पाहिले होते
स्वप्न माझे पूर्ण ना झाले
मात्र तर एक झाले की
डोळ्यातले अश्रू माझे तसेच राहिली
मी असे भासवले जगाला की मी खूप सुखात आहे
अनंत जखमा मनावर माझ्या झाल्या
पण सुख मात्र मी जगाला दाखवत होते
नात्यात काय तर मी त्यात घट्ट नाते विणले होते
ना जाणिले नाते माझे हृदयावर घाव माझ्या होत होते
मन मात्र माझे एकजुटिसठी झुरत होते
ह्या सगळ्यात मी माझी कर्तव्ये पर पाडत होते
असं वाटलं कीपण कसे जगलो
मनात आलं की मी आता मोकळा श्वास कुठे घेऊ
थकले शरीर माझे
किती मी अरा सुखाची वाट पाहू
वाटतं कसे जगलो आपण
हरवून अंधारात मी
शोधत होते मला मीच
ह्या आयुष्याच्या रस्त्यावर मीच मला शोधत होते
