STORYMIRROR

Jagannath kharate

Others

3  

Jagannath kharate

Others

आयुष्याचं गणित

आयुष्याचं गणित

1 min
193

पाटीवर आयुष्याच्या, सतत गिरवायचं असतं..

कुणी कितीही पुसलं तरी, पुन्हापुन्हा लिहायचे असतं.


इथली नातीगोती सारी, आपलीच म्हणून जपायची..

अनुभवांच्या कडक उन्हात,वाट आपनंच शोधायची..


सुखदा:खाच्या वेदनांना ,हळूवार सोसायचं असतं..

फाटक्या त्या मनाला, प्रेमधाग्यानी शिवायचं असतं‌.


कधी दिवस तर कधी रात्र,अखंड स्वप्न बाळगायचं..

तनामनाने एक होवुन,यशशिखर एकट्याने गाठायचं.


कसं जीवन जगायचं हे, ज्याचं त्यानंच ठरवायचं..

ऊन पावसाच्या श्रावणधारेला,अंगावरचं झेलायचं..


मी पणाच्या अहंकाराला, पायदळी तुडवायचं असतं.

जीवाशिवाच्या संगतीनं, आयुष्याचं गणित सोडवतायच


Rate this content
Log in