STORYMIRROR

Jagannath kharate

Others

3  

Jagannath kharate

Others

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
172

वैशाख वणव्यानं सारा आसमंत तो पोळंला.

धरा भेगाळंली सारी,रान सारा तो तांपला...


लाटा‌ वाहती ऊन्हाच्या,जसं म्रुगजळ भासे‌.

झाडाआड दडुनीया,पडती उजेडाचे कवडसे


 पानझडी होवुनीया पालापाचोळा तो पडे..

राणावनातली गुरढोरं, सावलीत झाडांच्या दडे


आभाळात दाटले ,काळ्या ढगांचे पुंजके..

जनु डोळे वटारुन पाही, राक्षसाचे ते‌ टोळके..


 वाहती घामाच्या त्या धारा, बळीराजा कावरला

देवा नारायणा सांग कशास, तु आम्हवरी रुसला

 

तहानली धरा सारी,तहानले तिन्ही लोक

तरी क रे पाहतो अजून, तू आपले कवतुक...


दया करी लेकरावरी,आम्ही अजान बालके

बरसू दे रे जलधारा,आम्हा लेकरासाठी कवतुके


विनवणी ऐकुन लेकरांची मन देवाचे पाळले..

बळीराजासाठी, मृगाच्या पावसाचे थेंब टपोरे गळाले


बरसतील जलधारा, सुटलासे मंद वारा..

पहिल्या त्या पावसाने मृदगंध मातीचा सुटला


Rate this content
Log in