आठवणींचे हळवे क्षण
आठवणींचे हळवे क्षण
1 min
172
कसे, अकल्पित जुळले, आठवणींचे हळवे क्षण..
हृदय चिंब भिजले, अन्, मोहरले ह्रदयांचे कण कण..
धुंद रानी वारा आला पायी बांधून पैंजण...
किंणकिणती सप्तसुरांच्या तारा नाद वाजे रुनझुन..
गंधित होई माती ,जनु शहारला तिचा तो कणकण ..
मेघ गर्जती आभाळी, जणू नाद मधुर तो छेडून...
