STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

आयुष्याची सायंकाळ

आयुष्याची सायंकाळ

1 min
199

आयुष्याच्या सरत्या काळात

आमच्या समोर चिंता कोणाची ? 

कष्ट केलेल्या या हातांना आत्ता

गरज आहे निःस्वार्थ हातांची 


खूप केली अंगभर मेहनत

गरज भासे क्षणभर आरामाची

नको आम्हांला पैसा अडका

प्रेम द्या जरासे आपलेपणाची


कोणालाही वेळ नाही आज

आमच्याकडे क्षणभर बघण्याची

जो तो आपल्या धुंदीत मस्त आहे

काळजी ना आमच्या जीवांची


कोणाच्या वाट्याला न येवो

देवाकडे मागणी आहे आमची

सर्वाना सुखी समाधानी ठेव

हीच प्रार्थना आम्हा पामराची 


Rate this content
Log in