आयुष्याचे गणित हे
आयुष्याचे गणित हे
1 min
285
देवा कसं सांगू
जीवनाचे गणित मला कळत नाही
हवेच्या झोतात दिवा शांत तेवत नाही
जे जे आपल्याला सावली देतात
वेळ आली तेव्हा दुःखही देतात
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंना
ते स्वतःहून दूर लोटतात
रस्त्यातून जाताना हीच माणसं
अर्ध्यावरती डाव मोडून जातात
खरंच नियती पण आपला डाव मांडते
खरा सोबती ती आपल्याला कधी देत नसते
