आयुष्याचा सफर
आयुष्याचा सफर
1 min
241
चला गाठू या आयुष्याचे शिखर
हसत खेळत करू या पार सफर
पहिली पायरी बालपणाची
नाही चिंता कशा कशाची
दुसरी पायरी तारुण्याची
उत्स्फूर्तेन स्वतःला सिद्ध करण्याची
तिसरी पायरी मध्यमवयाची
सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची
चौथी पायरी म्हातारपणाची
स्वतःसाठी जगण्याची अंतिम ध्येय गाठण्याची
असा हा आयुष्यरूपी सफर
उत्तुंगतेने करू या पार
