आयुष्याचा गाडा....
आयुष्याचा गाडा....


जन्मल्यानंतर सगळ्यांनाच आपलं नवल वाटतं
त्यावेळेस आपल्याला काहीच नको असतं
लहानपणी सगळ्यांना आपण हवहवसं वाटतं
आपल्या निर्मळ मनात फक्त चंचल विचार असतात
काहीतरी हवं असतं
सतत मग्न राहायला
दहा-बारा वयात आपण दुसऱ्यांना ओळखायला लागतो
काहीजण जवळ तर काहीजण दुरावलेली असतात
सर्वजणच माध्यमिक शाळेत ज्ञान प्राषन करण्याचा प्रयत्न करतात
सगळं सरळ असल्यामुळे कधी धक्काच बसत नाही
कुणीतरी हव असतं
आपलं सर्व लाड पुरवणारं
महाविद्यालयात आपण खूप आनंद लुटतो
अधून-मधून धक्केही घेत असतो
परिस्थितीची हळूहळू जाणीव होऊ लागती
आयुष्य खूप चटके देत असतं
कोणीतरी हवं असतं
आपल्या आयुष्याचा रथ चालविण्यासाठी
अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण तडपडतो
काहीजण आयुष्याला शीकवतात तर काहीजण त्यालाच संपवतात
हळूहळू जबाबदाऱ्यांचे ओझं येऊ लागतं
त्यावेळेस आपले साथी खूप कमी असतात
कोणीतरी हव असतं
कधी न साथ सोडणार....