आयुष्याचा अर्थ मज उमजेना
आयुष्याचा अर्थ मज उमजेना
वाटेवर चालतो पण वाट ही सापडेना
ह्या वाटेवरी मला सगळं स्वार्थ दिसतो आहे
जो तो पैशांमध्ये धावतो आहे
खरच ह्या आयुष्याचा अर्थ मज उमजेना
कळेना मला पोटासाठी पैसा आहे
. की पैशासाठी पोट आहे
कुठे मला कोणी समाधानी वाटतं नाही
खरच ह्या आयुष्याचा अर्थ मज उमजेना
यांत्रिक युगात अडकलेला मानव
हा पैशाच्या मागे धावत सुटला
स्वार्थापोटी तो प्रेम विसरला
खरच ह्या आयुष्याचा अर्थ मज उमजेना
दिसतंय मला ह्या धरतीवरती
कोणाच्या दुःखात ना सागे सोबती
फक्त ते सुखात दिसतात अवती भवती
कोणाला कोणाचं काही घेणंदेणं नाही
खरंच ह्या आयुष्याचा अर्थ मज उमजेना
