आयुष्य
आयुष्य
1 min
835
आयुष्य तर खूप सुंदर आहे
जगता आल पाहिजे
मी आणि माझ खूप झाल आता
मी पण विसरता आल पाहिजे
आयुष्य तर खूप सुंदर आहे
जगता आल पाहिजे
मनाची कवाडे उघडी ठेवून
स्वार्थाला दूर सारता आल पाहिजे
आयुष्य तर खूप सुंदर आहे
जगता आल पाहिजे
हृदयाची दारे खुली करून
एकमेकांना आलिंगन देता आल पाहिजे
आयुष्य तर खूप सुंदर आहे
जगता आल पाहिजे
जातिभेदाच्या भिंती दूर सारून
माणसाशी नात जुळवता आल पाहिजे
आयुष्य तर खूप सुंदर आहे
जगता आल पाहिजे.
