आयुष्य
आयुष्य
1 min
251
वेळ सरत होती तश्या आठवणी पुसत होत्या, विसरल्यामुळे की काय माहीत त्या पण रूसत होत्या.
आठवणींची सुध्दा आठवण करावी लागत होती, तिच्याशीच टिकवायची ती नाती होती.
प्रत्येक एक क्षण जो महत्वाचा होता, भूतकाळात जसा काही जमा होत होता.
बाकी काय ते फक्त वय वाढत होतं, जाणतेपणाची अलबत मिरवत होतं.
भरलेल्या सगळ्या जागी एक पोकळी होती, ऐलतीराला ही पैलतीराची जणू काही ओढच होती.
सगळं डोळ्यासमोर अलगद बदलत होतं, चांगल वाईट का होईना आयुष्यच होत.
