आयुष्य
आयुष्य
आयुष्यातील आपली साथ देणारी आपले सुख दुःख जाणणारी व्यक्ती आपल्या पासुन दुर गेली की त्या आठवणीने डोळ्यातील अश्रू न कळतपणे बाहेर येतात
आपण आपल्यापेक्षा जेव्हा इतरांची काळजी करतो, प्रेम करतो जीव लावतो त्या व्यक्तीने आपल्याला धोका दिला की त्या जाणीवेने डोळ्यातील अश्रू न कळतपणे बाहेर येतात
आपण आपल्या जीवनात जेव्हा खूप मेहनत घेतो, कठीण प्रसंगाला सामोरे जातो तेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीने आपली साथ सोडली की त्या वेदनेने डोळ्यातील अश्रू न कळतपणे बाहेर येतात
ज्या वेळेस आपण एखादे स्वप्न बघतो त्या दिशेने वाटचाल करतो ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपड करतो आणि त्याच वेळेस अचानक नियतीने पुर्ण होणारे स्वप्न थांबवले की त्या विचाराने डोळ्यातील अश्रू न कळतपणे बाहेर येतात
जीवन हे सुख दुःखाचा खेळ आहे कधी सुख येणार कधी दुःख येणार आपल्या आयुष्यातील प्रवासच खडतर आहे आणि हा प्रवास पार करत असताना ठेच लागली की त्या भावनेने कधी कधी डोळ्यातील अश्रू न कळतपणे बाहेर येतात
