आयुष्य
आयुष्य
1 min
236
पालथ्या घागरीत पाणी साठत नसते
कितीही ओता त्यावर भरून कळशी
अज्ञान्याला एकवेळ शिकवूही शकाल
कसे शिकवाल जो आहे मुळात आळशी?
पितळ नक्की उघडे पडते कधी तरी
कितीही आणला आव वा केले ढोंग
खरोखर झोपलेल्याला उठवूही शकता
कसे उठवाल घेणाऱ्याला झोपेचे सोंग?
कुपत्री दान कधीही करू नये मानवाने
खुशाल वाढा गरीब भुकेल्यांना पंगत
सद्गुणी सदाचारी व्यक्तीशी संग करावा
टाळावा आळशी व्यसनी व्यक्तीशी संगत
नित्यनियमाने वागाल तर नक्की होईल
आयुष्याचा प्रपंच नेटका आणि साजरा
जीवन मार्गावर गुलाब पुष्पवृष्टी होईल
दरवळेल पारिजात, केवडा आणि मोगरा
