STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Others

4  

RohiniNalage Pawar

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
197

आयुष्यात कित्येक वेळा घडतो

आपल्याशी वाईट व्यवहार,

आपल्याच निर्णयांच्या विळख्यात

गुंतून आपण मानतो हार...!!१!!


वाटू लागते आपल्याला आपली

काहीच किंमत राहिली नाही,

पण नोट किती जरी चुरगळली

तरी तिची किंमत कमी होतच नाही...!!२!!


आपल्याही आयुष्यात काही 

झालं असेल किंवा होणार असेल वाईट,

आपलीही किंमत चांगलीच असेल

करून ठेवा मनाशी ताईत !!३!!


भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा 

नका होऊन देऊ 'आज' वर परिणाम,

स्वतः घेतलेल्या निर्णयांनी नका उचलू असे पाऊल 

ज्याने फुटेल आपल्यालाच घाम...!!४!!


फक्त करून दाखवा

जग जिंकताना पहायला तयार आहे,

एकदा मनाशी ठरवून तर बघा

सगळं आपोआप घडणार आहे...!!५!!

 

कारण की,आपला स्वतःवरचा

तो मौल्यवान 'आत्मविश्वास' आहे...



Rate this content
Log in