आयुष्य मज सांगून गेले
आयुष्य मज सांगून गेले
1 min
152
कितीही कोणावर प्रेम केले तरी
कोणी कोणाचा नसतो
हे मला जगणे दाखऊन दिले
हेच गूज मज आयुष्य सांगून गेले
कितीही कोणासाठी झटले तरी
निःस्वार्थ कमी, स्वार्थ साधणारे जास्त असतात
हेच आयुष्याने मला शिकवून दिले
कितीही मन जपण्याचा प्रयत्न केला तरी
आपलेच लोक वेळेवर दगा देतात
हेच रहस्य आयुष्य मज सांगून गेले
कितीही कोणासाठी निःस्वार्थ सेवा केली
तरी वेळ आली तर तोच दगा देणारा ठरतो
हे आयुष्य मला दाखवून दिले
