आयुष्य हे एक कोडं आहे
आयुष्य हे एक कोडं आहे
आयुष्यावर सगळेच लिहितात
पण खरं सांगू का.......
आयुष्य हा एक मैदानातला खेळ नव्हे
तर आयुष्य हा एक
आपणच खेळलेला डाव आहे
शेवटी काय आयुष्य हे एक कोडं आहे
आयुष्याचा रस्त्यावर चालतांना
ह्यात संघर्ष हा येणारच
तो तुडवत सगळ्यांना हा रस्ता पार करायचा
शेवटी काय तर आयुष्य हा एक डाव आहे
ते एक कोडं आहे
. आयुष्यात पुढे जातांना
आपल्या स्वभावानं माणसं कमवावी लागतात
त्यांची सुखदुःख ही जाणवावी लागतात
. मग बघा आयुष्य हे सोपं होऊन जातं
जगण्यातील आयुष्य हे सोपं होऊन जातं
म्हणून म्हणते आयुष्य हे एक कोडं आहे
आयुष्यात पुढे जातांना
आयुष्य हे एक आपणच मांडलेला डाव आहे
जिंकलो तर पुढे आनंद आहे
हारलो तरी पुढे जायचं आहे
हरतांना कदाचित डोळ्यात अश्रू येतील
पण त्या अश्रूतही समाधान मिळवावं लागतं
खरच आयुष्य हे एक कोडं आहे
