आयुष्य गेलं करपून
आयुष्य गेलं करपून
सुंदर मोगरा माळुन
जात होती ती हरखून
दारूच्या वासानं आता
आयुष्य गेलं करपून
तिला नेहमी वाटायचं
त्यानी मनातलं ओळखावं
पण तिनं सांगितलेलेही
त्याला कधी कळावं ?
तिच्या साऱ्या सुप्त ईच्छा
बुडाल्या त्याच्या ग्लासात
तिच्या काही वेदना
लपल्या होत्या तिच्या हास्यात
सुखी स्वप्नांच्या कल्पनेनी
गेले डोळे तिचे भरून
दारूच्या वासानं जणु
आयुष्य गेलं करपून
न केलेल्या चुकांसाठी
त्यानं तिला छळावं
साऱ्यांचच दूःख ते
तिच्या अश्रुंतुन ढळावं
स्वतःच्या धुंदीतच
जात होता त्याचा वेळ
जमा-खर्चाचा आता
लागत नव्हता मेळ
मनातली सुंदर स्वप्न
पहात होतो ती दूरून
दारूच्या वासानं जणु
आयुष्य गेलं करपून
पदरात पडले ते
गोड मानत होती
जगण्यासाठी रोज नवं
कारण शोधत होती
मनाला आता रमवते
दूःख बाजुला सारुन
सहन करते सगळं
जगते भावनांना मारुन
आशा तिला, प्रकाशेल जीवन
निराशेचे ढग हटवुन
दारूच्या वासानं जणु
आयुष्य गेलं करपून
हळुहळू बदलत गेली
तिची त्याची भाषा
तिच्या त्याच्या आयुष्याचा
झाला जणु तमाशा
चेहेरा खरा लपवत
होती जरी ती हसली
मनातलं दूःख नव्हती
गालात लपवु शकली
डोळ्यातलं पाणी तिच्या
गेलं आता पार सुकून
दारूच्या वासानं जणू
आयुष्य गेलं करपून
