STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Others

'आय लव यू' म्हण ना !

'आय लव यू' म्हण ना !

1 min
810

पिक्चरमध्ये करतात, तसं प्रेम कर ना.

खोट खोट असू दे, पण 'आय लव यु म्हण ना.


तुझी माझी साथ अशी जन्मांतरी राहू दे.

तुझ्या डोळ्यात मला माझं रुप पाहु दे.


प्रेम नसो, राग असो, व्यक्त तु कर ना.

खोट खोट असू दे, पण 'आय लव यु म्हण ना.


उणीपुरी लग्नाला झाली ... वर्ष 

रुसवा फुगवा सोड आता दिसू दे हर्ष


अपुर्‍या ईच्छा, अपुरी स्वप्न सारं बाजुला ठेव ना.

खोट खोट असू दे, पण 'आय लव यु म्हण ना.


दिवसाची रात्र, लक्ष मुलांकडे

कधी पाहिलस नाही पिकल्या केसांकडे


खुप झालं बस्स आता, माझ्या जरा बघ ना.

खोट खोट असू दे, पण 'आय लव यु म्हण ना.


स्वार्थी नाही मी, अपराधी नाही मी

मला ही थोडं समज ना.

......मम्मी, मला ' आय लव यू' म्हण ना.


साहित्याला गुण द्या
लॉग इन