आठवतं का गं तुला
आठवतं का गं तुला
1 min
446
आठवतं का गं तुला
ह्या हिरवळीवर बसून
आपण प्रेमाचे गीत गात होतो
आठवतं का गं तुला
ती वाऱ्याची झुळूक आणि तो पाऊस
त्यात आपण चिंब भिजलेलो
आठवतं का गं तुला
ते झाडावरच फुलपाखरू
त्यांना बघून मन आनंदित होत होत
आठवतं का गं तुला
ते रम्य दिवस
त्या आठवणीत अजूनही हरवून जावास वाटतं
चल सखे परत त्या रम्य आठवणीत आपल्या
दोघंही हरवून जाऊ एकमेकात
