Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Punaji Kotrange

Children Stories

4.0  

Punaji Kotrange

Children Stories

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

1 min
160


निसर्गाची किमया 

किती ही पुराणी

पावसाच्या या सरी

आठवी बालपणीच्या आठवणी


पावसातले ते दिवस 

असती फार गोड 

चिखलात खेळत बसायचे

भातुकलीचा खेळ


खेळा- खेळात 

बनवायचे मातीचे घर

वाहून न्यायची घराला 

पावसाची ती सर


शाळेला असायच्या 

सुट्ट्याच सुट्ट्या

शेतावर जाऊनी 

पेंढ्या फेकायच्या


कधी कधी आम्ही

चिखलात लोळी

रोवण्यात कधी खायचे

वरणभात तर कधी पुरणपोळी


शाळेत जायची नसायची 

कुणाला हाऊस

वाटे परत यावा तो

आठवणीतला पाऊस


Rate this content
Log in