STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

आठवणींच्या हिंदोळ्यावर

आठवणींच्या हिंदोळ्यावर

1 min
409

स्वप्न पडती नव्या निसर्गाचे

केंव्हा येतो पाऊस अवनीवर

सुख समाधानाच्या बरसे धारा

मग आठवणींच्या हिंदोळ्यावर


आला जवळ श्रावण महिना

हिरवा साज नवा चढविला

खूप गावू गाणे आंनदाचे

आशिर्वाद देवू या निसर्गाला


मेघमल्हार भरे आसमंती

आले खुशीचे दिवस सणांचे

धरणी न्हाते भर पावसात

झुलते रेशमी पंख पक्ष्यांचे


आठवणीच्या अंगणात

जळमट काढी तनामनाचे 

चांदण्याचा मस्त लपंडाव   

रचितो बेत संकल्पनेचे


वृक्ष लावू या जागोजागी

करू संवर्धन आरोग्यासाठी

पाना-फुलांचे हार गजरे

फळे चाखू या गोड गोमटी


शोभती स्त्रियांना अलंकार

कंदमुळ, फळे हवीत पुजनाला

हाती घेवुनीया बियांची परडी

वृक्षाचा नैवेद्य लावू या गौरीला


Rate this content
Log in