आठवण
आठवण
1 min
198
आठवणीत राहू
आठवणीत जगू
आठवण करत
चल संसार करू
कसा गेला तो काळ
कशी संपली ती वेळ
मागोवा पाहतांना
कळेल जीवाचा खेळ
वेळ येत नाही ही
गेलेली पुन्हा कधी
संधी सोडूच नये
विचार करु आधी
हाती भविष्य तुझ्या
दोष ना नशिबाचा
कर्म जसे करेल
फळ मिळेल आयुष्याचा
चांगल्या आठवणीत
जीवन जगायचं
योग्य काम करून
स्मरणात राहायचं
