STORYMIRROR

Prashant Kadam

Others

3  

Prashant Kadam

Others

आठवण !!

आठवण !!

1 min
274

लहानपणी अर्ध्या चड्डीत 

मित्रांसोबत खेळायचो 

तेंव्हा ची आठवते गोष्ट,

हसत खेळत मौज मजेत

दिवस ते सरायचे मस्त


आपापसात भांडलो तरी

मिळेल त्यावर ताव मारत

बिनदिक्कत खायचो ऊष्ट,

भांडणे मारामारी झाली तरी

एकमेकांवर नसायचो रुष्ट


खिशात नसायची दमडी

पण वार्ता करायचो मोठ्या

मी मोठा हेच तर दाखवायचो फक्त,

महागाईची नव्हती जाणीव 

सगळेच कसे वाटायचे स्वस्त


रागावलो की घालायचो शीव्या

एक दुस-याची का‌‌लर पकडायचो

खेळात हवी असायची शिस्त,

थोड्याच वेळात व्हायचो शांत

पण आम्ही मनातून नव्हतो दुष्ट 


आता कोणीच संपर्कात नाही

कामा शिवाय भेटत नाही

प्रत्येक जण कामात व्यस्त,

मैत्रीचा सगळ्यांना पडलाय विसर

प्रपंचातच सगळे अडकलेत जास्त


Rate this content
Log in