आठवण
आठवण
एक आठवण
आठवते बालपण
जेव्हा जात होते मी शाळेत
रमत होते अभ्यासात
दमत होते मैदानावर
स्पर्धा , काब्य, प्रश्न मंजुषा
सारे सारे जणू माझ्याच साठी
नृत्य ,वादविवाद आणि वर्गाचे नेतृत्व
किती हा पसारा पण नाही कुठे माझी माघार
हे काय कमी होते , आली स्पर्धा प्रसंग नाट्य दर्शनाची
जुंपले सारे तालमीला, माझे पात्र शिक्षकेचे,
मस्त रंगले प्रसंग नाट्य, गटाला पारितोषिक पहिले
चर्चे मध्ये विचारले , नाट्यातली शिक्षिका तुमची उंचीने
लहान, का तिजला दिले हे पात्र महान?
बाई म्हणाल्या आमच्या, सादरीकरण तिचे उत्तम
तिच्यात आहे गुण गुरुचे , वाणीत आहे गोडवा
मन आनंदले ती आठवण मनावर कोरली गेली
तेव्हाच निश्चय केला, आपण व्हायचं शिक्षक.
ठरवले ते पूर्ण केले ज्ञानदानाचे कार्य स्वीकारले
अरे हे सांगायचे राहूनच गेले
ज्या गुरूंनी माझे गुण जाणले, त्या मुळे माझे भविष्य घडले
त्या माझ्या गुरूंना शतशः प्रणाम.
