आठवण तुझी
आठवण तुझी
तुझ्या त्या गोड आठवणी
बनुन राहिलाय रोजचा प्रवास,
होतीस तु माझी जिवप्राण
तुच होतीस माझ्या जीवनी खास... !!!
जिवंत या आठवणी साऱ्या
अमर राहणार माझ्यासाठी राणी,
विचार न्हवता केला दुराव्याचा
साऱ्या स्वप्नांवर तु पाडलस पाणी...!!!
कितीही भयाण ऊन असलं तरी
ओलावा मात्र जात नाही,
आठवणींचं पाखरू उडून गेलं तरीही
माझ्या नयनी तुझं रूप दिसतंच राही... !!!
संथ पाण्यात तरंगाव तसं
मी तुझ्या स्वप्नी तरंगतोय,
स्वार्थी तुफान लाट आली अन,
दुरावल पाखरातील आपलेपण... !!!
आठवणीत गोठून मी तुझ्या
मोजतोय रोज स्वप्नीतारे,
मुरुनी तुझ्या मी हृदय अवकाशी
मोजतोय येकयेक स्मरणी सारे... !!!
शब्दच ओठी उरले नाही आज
अबोल होऊनी बसलोय सखे,
आठवणी विसरणं अशक्य झालंय,
मन माझं तुझ्याच गुरफटलंय... !!!
